इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील एका नामांकीत हॅाटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतांनाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. पोलिस दलातील दोन बिट मार्शल यांचे निलंबन केले. त्यांच्यावर कामात हालगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय संबधित हॅाटेलही सील करुन पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
शिवाजीनगर परिसरात एक पब पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. या पबमध्ये अल्पवयीनमुले ड्रग्सचे सेवन करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर प्रशासन जागे झाले व त्यांनी मोठी कारवाई केली.
धंगेकर यांचा आरोप
शिवाजीनगर या परिसरामध्ये सर्वाधिक कॉलेज व शाळा आहेत. अशा परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे सेवन होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, भ्रष्टाचारी राजपूत हे काय झोपा काढतात का…? तुमचा खिसा भरण्याच्या नादात आमची पोरं बरबाद होत आहेत. देसाई साहेब अजूनही तुम्हाला संधी आहे…कारवाई करा… नाहीतर या राजपूत पायी तुम्ही मंत्रीपद गमवाल अशी टीका काँग्रसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केले आहे.