इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीनंतर भाजप २८८ जागापैकी १५५ जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. तर शिवसेना शिंदे गटाला ६५ व राष्ट्रवादी अजित पवार गटाला ५५ जागा तर १३ जागा मित्रपक्षाला सोडण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेनंतर शिंदे व अजित पवार गट सावध झाले आहे.
लोकसभा निवडणुकीतही भाजपने सर्वाधीक जागा घेतल्या होत्या. पण, त्यांच्या नऊच जागा निवडून आल्यामुळे भाजपने एकला चलोची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मित्रपक्षाला कमी जागा अगोदर सोडायच्या व त्यातून त्यांनी साथ सोडली तर एकट्याने निवडणूकीला सामोरे जायचं ही भाजपची रणनिती आहे.
पण, विधानसभेचा संपूर्ण कालावधी पूर्ण करुन सत्ता जागा वाटपात येऊ नये यासाठी लोकसभे सारखेच मिक्षपक्षाला शेवटपर्यंत झुंझत ठेवण्याची रणनिती असल्याची माहिती समोर आली आहे.