इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अखेर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर रविवारी अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती. त्यात सोनाक्षीच्या कुटुंबियाचा विरोध असल्याची चर्चा होती. पण, हा विरोधही मावळलेला दिसला. दोघांनी कोर्ट मॅरेज केले. झहिरच्या घरी हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे नवरदेव-नवरी या दोघांच्या स्वाक्षरीवेळी नवरीचे वडील शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या बाजूलाच उभे होते. सोनाक्षीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
सोनाक्षीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतांना त्याखाली लिहले आहे. आजच्याच दिवशी, सात वर्षांपूर्वी (23.06.2017) एकमेकांच्या डोळ्यात, आम्ही प्रेमात पडलो. आज त्या प्रेमाने आज या क्षणापर्यंत नेले आहे… जिथे आमच्या दोन्ही कुटुंबांच्याच्या आशीर्वादाने आम्ही पती पत्नी होत आहोत. प्रेम, आशा आणि एकमेकांसोबत सर्व सुंदर गोष्टी आहेत, आतापासून ते कायमचे.