इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या जामिनावर दिल्ली उच्च न्यायालयाने घातलेल्या स्थगितीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी उद्या सकाळी सुनावणी घेण्याची विनंती केली आहे.
शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला आहे. त्यानंतर आज केजरीवल यानी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कथित दारू घोटाळा प्रकरणात न्यायालयाने आप प्रमुखांच्या जामीनाला अंतिम आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. हायकोर्टाने वकिलांना सोमवारपर्यंत लेखी सबमिशन दाखल करण्यास सांगितले आहे. पण, आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे तेथे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.