पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- यवत गावातील सहजपूर फाट्याजवळ राज्य परिवहन बस झाडावर आदळल्याने ३० प्रवासी जखमी झाले. २ ते ३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी ही माहिती दिली.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पुणे – सोलापूर रस्त्यावर यवत जवळ ही घटना घडली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. ही बस पंढरपूर येथून मुंबईसाठी रवाना झाली होती.