इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः आम्ही लोकसभेवर, विधानसभेवर जायचे नाही. अधिकारक्षेत्रात तुमचे १०-२० जण आणि आमचा एकही नको,. असे चालणार नाही. विधानसभा आणि लोकसभेतही आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. लढाई अजून संपलेली नाही. आता घरी बसून चालणार नाही. हक्कांसाठी वणवा पेटवावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
जालन्यातील वडगोद्री येथे ते म्हणाले, की आपण सगळे एकत्र राहिलो तर ओबीसी समाजाचे आरक्षण वाचेल, अन्यथा आपल्या दुहीचा फायदा अनेक घेतील. आम्ही ओबीसी शांत बसलो, याचा अर्थ आम्ही गरीब आहोत, असा नाही. तुम्ही आम्हाला कुठेही न्यायला आम्ही जनावर नाही, असे सांगताना त्यांनी आपल्या तासभराच्या घणाघाती भाषणात विरोधकांचा समाचार घेतला. शेरोशायरी करत ओबीसी आंदोलकांमध्ये ऊर्जा भरली.
अब जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद भुल गए, शायद अपनी याद उनको दिलानी होगी, असा शेर सुनावताच ओबीसी आंदोलकांनी एकच गलका केला. काही लोक आपली औकात विसरले, असे सांगतान औकातीमध्ये राहा बेट्याहो, असा इशारा भुजबळ यांनी दिला. दादागिरी थांबवा. कोणी म्हणेल आम्ही मालक आहोत. सरकारमध्ये आणि विधानसभेत आम्ही जास्त आहोत, म्हणजे यांना दाबू; परंतु हा गैरसमज मनातून काढून टाका, असा इशारा त्यांनी दिला.