इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशवर ५० धावांनी विजय मिळवत सुपर ८ मध्ये सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाने फलंदाजी करत बांगलादेशला विजयासाठी १९७ धावांचे आव्हान दिले. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशला २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून १४६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
शनिवारी इंडिया विरुद्ध बांगलादेश सुपर ८ सामन्याला सुरुवात झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही टीम इंडियाची सलामी जोडी बॅटिंगसाठी मैदानात आली आहे. उपकर्णधार हार्दिक पंड्या याच्या नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून १९६ धावा केल्या.
निकोलस पूरनचे १७ षटकार
या स्पर्धेत बांगलादेशच्या निकोलस पूरनचे १७ षटकार झाले आहेत. ख्रिस गेलने २०१२ वर्ल्डकप स्पर्धेत १६ षटकार, मार्लन सॅम्युअल्सने २०१२ टी20 वर्ल्डकपमध्ये १५ षटकार, शेन वॉटसनने २०१२ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत १५ षटकार मारले आहेत. त्यामुळे निकोलसचे १७ षटकार हा विश्वविक्रम ठरला.