नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही स्पर्धात्मक परीक्षांच्या संदर्भात करण्यात आलेल्या काही आरोपांच्या अलीकडेच घडलेल्या घटना लक्षात घेऊन, आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे आयोजित केलेल्या NEET-PG प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेच्या मजबूतपणाचे सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून उद्या म्हणजेच २३ जून २०२४ रोजी होणारी NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आरोग्य मंत्रालयाने मनापासून दिलगीरी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.