नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुठलेही कारण नसतांना रिक्षातील टोळक्याने दुचाकीस्वारास बेदम मारहाण केल्याची घटना आर्टिलरी सेंटर रोडवरील हरीओमनगर भागात घडली. या घटनेत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून, त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास तानाजी सहाणे (३८ रा.हरिकृष्ण अपा.फेस ३ हरिओमनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सहाणे गेल्या शनिवारी (दि.१५) रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथून हरिओमनगरच्या दिशेने जात असतांना ही घटना घडली. मोपेड दुचाकीवर ( एमएच १५ डीएच ८१४३) ते प्रवास करीत असतांना हरिओमनगर परिसरात रिक्षातून आलेल्या तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्यांची वाट अडविली. यावेळी कुठलेही कारण नसतांना संशयितांनी शिवीगाळ करीत सहाणे यांना मारहाण केली. या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करीत सहाणे यांची दुचाकीही भामट्यांनी फोडून टाकली. अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.
……….
१ लाख ५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मैत्रीणी समवेत रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना जेलरोड परिसरातील मोटवाणीरोड भागात घडली. या घटनेत एक लाखाच्या मंगळसुत्रावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोनाली गणेश गाजरे (रा.साई रतन सोसा.उत्सव लॉन्स समोर) यांनी फिर्याद दिली आहे. गाजरे शुक्रवारी (दि.२१) दुपारी मैत्रीण सोनाली बोडके यांच्या समवेत कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. मोटवाणी रोडने दोघ्या मैत्रीणी परिसरातील उत्सव लॉन्सच्या दिशेने पायी जात असतांना कॉर्नरवर समोरून डबलसिट येणा-या दुचाकीस्वारानी त्यांच्या गळयातील सुमारे १ लाख ५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.
……..
३९ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील चाणक्यनगर भागात राहणा-या ३९ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जयेश आत्माराम कोठावदे (३९ रा.शिवशक्ती बंगला,चाणक्यनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कोठावदे यांनी मंगळवारी (दि.१८) दुपारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी किटकनाशक औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच भाऊ विजय कोठावदे यांनी त्यास तातडीने उमा हॉस्पिटल येथे दाखल केले होते.
शुक्रवारी (दि.२१) उपचार सुरू् असतांना डॉ.धनंजय पाटील यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत डॉ. स्मिता बोरलेकर यांनी खबर दिल्याने पोलीस दप्तरी मृ्त्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक टिळेकर करीत आहेत.