इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत राज्यात भाजपला अपयश आल्यानंतर दुस-या पक्षातून भाजपमध्ये आलेले आता बाहेर पडू लागले आहे. भाजपला पहिला झटका माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी दिला आहे. त्यांनी भाजपचा आज राजीनामा दिला आहे.
२०१४ मध्ये त्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्या होत्या. त्यानंतर १० वर्षानंतर त्यांनी आपला भाजपमधील प्रवास थांबवला आहे. त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे.
सुर्यकांता पाटील या माजी केंद्रीय मंत्री राहिल्या आहे. हिंगोली नांदेड मतदार संघातून त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी शरद पवार यांचे कौतुक केले होते. त्यामुळे आता त्या कोणत्या पक्षात प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.