इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजी नगर – मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानकपणे खालावली त्यांना पुन्हा सलाईन सुरू करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या हृदयाची तपासणी सध्या सुरू आहे. टूडी इको, इसीजीसह अत्याधुनिक मशिनद्वारे मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केली जात आहे. काल बीड दौऱ्यावर गेल्या पासून अस्वस्थ वाटत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी डॉक्टरांना सांगितले आहे.
डॉ. विनोद चावरे यांनी जरांगे यांच्या प्रकृतीबाबतचे अपडेट्स दिले आहे. त्यांना पुढील काही दिवस उपचाराची गरज आहे. आज त्यांच्या विविध तपासण्या केल्या आहेत. पुढील काही दिवस रुग्णालयात उपचार घेण्याची गरज असल्याचे सांगितले.