नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकत नाही, अशी सर्वांची मानसिकता होती, मी दिलेला शब्द पाळतो, मी जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय घेतला. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी शिक्षक झालेल्या जुन्या पेन्शन योजनेचा लाभ दिला. आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षकांचे सर्व विषय सोडवू, शिक्षकांना आपण खुश ठेवलं पाहिजे. शिक्षक असताना देखील आणि निवृत्त झाल्यावर देखील शिक्षक कामाचाचं असतो असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक विभाग शिक्षक मंतदार संघात किशोर दराडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
ओझर येथे दराडे यांच्या प्रचारासाठी आयोजित जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी किशोर दराडे आपले उमेदवार आहे. किशोर दराडे यांचे काम आपल्यासमोर आहे. शेतकरी जसा अन्नदाता तसाच समाज, देशाचं भवितव्य घडवणारे म्हणून आपण शिक्षकांकडे पाहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला घडवण्याचं काम शिक्षक करतात. देशाची सुजाण आणि सुसंस्कृत पिढी घडवण्याचं काम शिक्षक करतात. ही निवडणूक सर्वांसाठी महत्वाची. तुमचा आशीर्वाद दराडे यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.
या मेळाव्यात त्यांनी लोकसभा निवडणूकीवर भाष्य केले. ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत चुकीचा प्रचार केला गेला, संविधान बदलणार
लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून महायुतीकडून काही चुका झाल्या. उमेदवार जाहीर करायला उशीर झाला, काही आपलेच लोक उभे राहिले.
पण आता लोकसभेच्या पराभवाचं उट्ट आपल्याला शिक्षक निवडणुकीत काढायचंय आहे.