इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या १० दिवसांपासून ओबीसी आरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषण करणारे लक्ष्मण हाके यांनी आंदोलन स्थगित केले. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. पण, आंदोलन स्थगित केले असले तरी ते थांबवले नाही असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते यांच्या बैठकीत झालेले निर्णय यावेळी छगन भुजबळ यांनी वाचून दाखवले.
यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले, राज्य सरकारने आमच्या दोन मागण्या मंजूर केल्या आहेत. दोन मागण्यांबाबत तांत्रिक कारण आहेत. सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश यायचा आहे. सर्व पक्षीय बैठक घेतल्याशिवाय अध्यादेश काढणार नाही असे सरकारने सांगितलं आहे. बोगस कुणबी सर्टिफिकेट देणारे आणि घेणारे यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. आम्ही त्यावर लाखो हरकती दाखल केल्या आहेत. त्याबाबतची श्वेत पत्रिका काढा. आमचे आंदोलन थांबलेले नाही. आंदोलन स्थगित केले आहे असे लक्ष्मण हाके म्हणाले.