नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरफोडीत चोरट्यानी सुमारे साडे सतरा लाखाच्या ऐवज लंपास केला. ही घटना औद्योगीक वसाहतीतील महालक्ष्मीनगर भागात घडली. या घरफोडीत चोरट्यांनी पंधरा लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरया विनीत सिंग (रा.चतुर्भुजा अपा.समाज मंदिराजवळ महालक्ष्मीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सिंग कुटुंबिय गुरूवारी (दि.२०) रात्री बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली १५ लाखाची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १७ लाख ६२ हजार ४७० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास निरीक्षक पवार करीत आहेत.
………
……….