इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशाची चर्चा सर्व गृहनिर्माण सोसायटीचमध्ये आहे. तीन अपत्य असलेल्या सदस्याला गृहनिर्माण सोसायटीची निवडणूकही लढवता येणार नाही, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्या एकलपीठाने एका गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षाला अपात्र ठरविणाच्या उप निबंधकाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले आहे.
एकता नगर को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष पवनकुमार नंदकिशोर सिंह यांनी त्यांच्या अध्यक्षपदावरील निवडीला आव्हान देणाऱ्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. सिंह यांना तीन अपत्ये आहेत. त्यामुळे त्यांना अपात्र करावे अशी मागणी सोसायटीतील काही सदस्यांनी केली होती. या तक्रारीवर उपनिबंधकांनी सिंह यांना अपात्र ठरवले. त्याविरोधात सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.








