इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोणतेही काम सतत केले की त्यातून विश्रांती सर्वच जण घेतात. पण, चित्रपट अभिनेत्याने घेतलेली ही विश्रांती नेहमीच चर्चेची असते. काही चित्रपट कलाकार तर सोशल मीडियातून फोटो टाकून ती चर्चेची सुध्दा करतात. पण, आता एका प्रसिध्द अभिनेत्याची ही सुट्टी मात्र वेगळ्या कारणासाठी आहे. त्यामुळे त्याचे कौतुकही होत आहे. हा अभिनेता आहे रणबीर कपूर. ता त्याने ॲक्टिंगमधून ब्रेक घेत असल्याचे जाहीर करुन त्याच्या फॅन्सना धक्का दिला आहे. सोशल मीडियावर नुकत्याच झालेल्या एका ‘fan interaction’ दरम्यान त्याने ही माहिती दिली.
सहा महिन्यांचा ब्रेक.. हे दिले कारण
हा ॲक्टिंग ब्रेक सहा महिन्यांचा असेल. आणि या ब्रेक दरम्यान तो आपली मुलगी ‘राहा’ हिला अधिक अधिक वेळ देणार आहे. या काळात तो कुठलेही नवीन वर्क प्रोजेक्ट स्वीकारणार नसल्याचे त्याने सांगितले.
पॅरेंटिंग लिव्ह
आपल्याला बऱ्याच वेळापासून पॅरेंटिंग लिव्ह घ्यायची होती. राहाच्या जन्मानंतरच्या सुरवातीच्या दिवसात कामात अतिशय व्यस्त असल्याने तिला जास्त वेळ देता आला नाही. तेंव्हा यासाठी ही योग्य वेळ असल्याचे तो म्हणाला. दरम्यान त्याची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट तिच्या ‘ जिगरा’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार असल्यामुळे या दिवसांत आपण राहा बरोबर राहणार असल्याचे त्याने सांगितले.
‘ॲनिमल’ चे प्रदर्शन
रणबीर कपूर सध्या आपल्या आगामी ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. हा चित्रपट येत्या १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटात त्याच्याबरोबर अनिल कपूर व दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हे प्रमुख भूमिकेत दिसतील. त्याचबरोबर सनी देओलही या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.