नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये वादग्रस्त पत्रकामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. या पत्रकामुळे दोन समाजाता तेढ निर्माण होण्याची भीती होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले.
शहरातील पंचवटी परिसरातील फुलेनगर भागात शनिवारी पहाटे ही वादग्रस्त पत्रके आढळली त्यानंतर हा तणाव निर्माण झाला. याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके, अर्जुन पगारे, प्रशांत जाधव यांनी पोलिस स्थानकात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर वैयक्तीक वादातून अद्दल घडवण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
या पत्रकामुळे पंचवटीत मोठा जमाव गोळा झाला. त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. पण, सामाजिक कार्यकर्ते, पोलिसांनी हस्तक्षेप करुन शांतता निर्माण केली.