बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कांदा खरेदीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक…भारत दिघोळे यांनी केली ही मागणी

by India Darpan
जून 22, 2024 | 2:27 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240620 WA0245 2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेतकरी उत्पादक कंपन्यां, अधिकारी आणि व्यापारी यांची साखळी तयार होऊन नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कांदा खरेदीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असून यामध्ये कांदा खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे खुद्द नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनीच मान्य केले आहे नाशिक जिल्ह्यातील काही नाफेड खरेदी केंद्रावर त्यांनी अचानकपणे भेटी दिल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे याच पार्श्वभूमीवर नाशिकसह महाराष्ट्रातील नाफेड व एनसीसीएफसाठी कांदा खरेदी करणाऱ्या सर्व खरेदी केंद्रावरील पुढील संपूर्ण कांदा खरेदी केंद्र सरकारने पुर्णपणे बंद ठेवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे

केंद्र सरकारने यावर्षी बफरस्टॉकसाठी नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून 5 (पाच) लाख टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यातील प्रत्येकी अडीच लाख टन कांदा अनुक्रमे नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून नाशिकसह महाराष्ट्रातील धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे,बीड, धाराशिव, सोलापूर आदी जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना टेंडरद्वारे कांदा खरेदीचे उद्दीष्ट ठरवून दिले आहे संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्याचे महासंघ व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नाफेड व एनसीसीएफसाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणे आवश्यक होते परंतु संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आधीच स्वस्त दरातील कांदा आपल्या गोडाऊनमध्ये भरून ठेवलेला होता आता नाफेडचे कांदा खरेदीचे दर वाढल्यानंतर हाच स्वस्तातील कांदा नाफेडसाठी खरेदी केल्याचे दाखविले आहे शेतकऱ्यांकून कांदा खरेदी न करता बाजार समितीतून व्यापारी खळ्यांवरील कांदा खरेदी केला जात होता ऑनलाईन कांदा खरेदी विक्रीमध्ये घोटाळा केल्याचे अध्यक्षांना निदर्शनास आले आहे नाफेडसाठी अधिकृत विकत कांद्यापेक्षा दुप्पट कांदा गोडाऊनमध्ये आढळून आला पाच ते सहा खरेदी केंद्रावर चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसून आले आधार कार्ड शिक्के मारून ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहारात गडबड केली गेली तसेच खरेदी-विक्री व्यवहारात दलाली होत असल्याचा अध्यक्ष जेठाभाई अहिर यांच्या पाहणीत उघड झाले आहे

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने यापूर्वीच नाफेड व एनसीसीएफच्या कार्यालयामध्ये जाऊन लेखी पत्राद्वारे तसेच ईमेल करुन संपूर्ण कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने करावी तसेच बफरस्टॉकसाठीच्या कांदा खरेदीत शेतकऱ्यांना सर्वाधिक दर मिळावा यासाठी नाफेड एनसीसीएफने थेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून लिलाव प्रक्रियेतून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा अशी मागणी केली होती नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदीतील या भ्रष्टाचाराची व्याप्ती प्रचंड मोठी असून

नाफेडच्या दस्तूरखुद्द अध्यक्षांनाच नाफेड कांदा खरेदीत प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले आहे यावरून नाफेड एनसीसीएफच्या बोगस खरेदीबद्दल महाराष्ट्र राज्य कांदा संघटनेने तसेच राज्यातील कांदा उत्पादकांनी व्यक्त केलेला संशय खरा ठरला असून जोपर्यंत नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीतील बोगसगिरीची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत नाफेड एनसीसीएफसाठी बफर स्टॉकचा कांदा खरेदी करणाऱ्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे कांदा खरेदीचे काम केंद्र सरकारने तत्काळ बंद करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अयोध्या येथे राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापनेतील मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

Next Post

नाशिकमध्ये वादग्रस्त पत्रकामुळे तणाव, पोलिसांनी केली तातडीने कारवाई

India Darpan

Next Post
IMG 20240622 WA0251

नाशिकमध्ये वादग्रस्त पत्रकामुळे तणाव, पोलिसांनी केली तातडीने कारवाई

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011