नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगरपालिकेत आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक असल्याचा प्रभाव टाकून ठेकेदाराचे नाला बांधकामाचे मंजूर झाल्यावर स्वतःसाठी व इतरांसाठी बक्षीस म्हणून चार टक्के प्रमाणे ३३ हजाराची लाचेची रक्कम घेणा-या मालेगाव महानगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक सचिन महाले यांच्याकडे लाखोचे घबाड घरझडतीमध्ये मिळाले आहे.
महाले यांच्या वर्धमान नगर येथील घराची पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी घरझडती घेतली. त्यात रोख रक्कम रुपये १३ लाख १० हजार २०० रुपये रोख व सोन्याचे तीन क्वाईन व एक सोन्याचा तुकडा वजन एकुण १३३ ग्राम मिळाले आहे.
३३ हजार रुपये घेतांना पकडले
तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून मालेगाव महानगरपालिके अंतर्गत गटार बांधकामाचे टेंडर तक्रारदार यांच्या भावाचे नावे घेतलेले होते. त्याप्रमाणे काम पूर्ण करून केलेल्या नाला बांधकामाचे बिल मंजूर करण्याकरिता आलोसे यांना भेटले असता महाले हे मालेगाव महानगरपालिकेत आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक असल्याचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव टाकून त्यांचे नाला बांधकामाचे बिल मंजूर करून देतो असे सांगून बिल मंजूर झाल्यावरती स्वतःसाठी व इतरांसाठी बक्षीस म्हणून चार टक्के प्रमाणे पैसे द्यावे लागतील असे सांगितलेले होते. त्याप्रमाणे तक्रार यांची नाला बांधकामाचे बिल मंजूर झाल्या नंतर तक्रारदार हे महाले यांचे भेटी करता गेले असता दिनांक १३/०६/२०२४ रोजी सचिन सुरेंद्र महाले यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष तक्रारदार यांच्यावर प्रभाव टाकून स्वतःसाठी व इतरांसाठी लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्याप्रमाणे २१ जून रोजी आलोसे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचे कडून ३३ हजार रुपये मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली. यावेळी पंचां समक्ष महाले यांना ताब्यात घेण्यात आले असून किल्ला पोलीस स्टेशन, मालेगाव येथे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.