नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगरपालिकेत आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक असल्याचा प्रभाव टाकून ठेकेदाराचे नाला बांधकामाचे मंजूर झाल्यावर स्वतःसाठी व इतरांसाठी बक्षीस म्हणून चार टक्के प्रमाणे ३३ हजाराची लाचेची रक्कम घेतांना मालेगाव महानगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक सचिन महाले हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून मालेगाव महानगरपालिके अंतर्गत गटार बांधकामाचे टेंडर तक्रारदार यांच्या भावाचे नावे घेतलेले होते. त्याप्रमाणे काम पूर्ण करून केलेल्या नाला बांधकामाचे बिल मंजूर करण्याकरिता आलोसे यांना भेटले असता महाले हे मालेगाव महानगरपालिकेत आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक असल्याचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव टाकून त्यांचे नाला बांधकामाचे बिल मंजूर करून देतो असे सांगून बिल मंजूर झाल्यावरती स्वतःसाठी व इतरांसाठी बक्षीस म्हणून चार टक्के प्रमाणे पैसे द्यावे लागतील असे सांगितलेले होते. त्याप्रमाणे तक्रार यांची नाला बांधकामाचे बिल मंजूर झाल्या नंतर तक्रारदार हे महाले यांचे भेटी करता गेले असता दिनांक १३/०६/२०२४ रोजी सचिन सुरेंद्र महाले यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष तक्रारदार यांच्यावर प्रभाव टाकून स्वतःसाठी व इतरांसाठी लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्याप्रमाणे २१ जून रोजी आलोसे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचे कडून ३३ हजार रुपये मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली. यावेळी पंचां समक्ष महाले यांना ताब्यात घेण्यात आले असून किल्ला पोलीस स्टेशन, मालेगाव येथे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
*यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – नाशिक
*तक्रारदार- पुरुष, वय- ३४वर्ष.
आलोसे- श्री सचिन सुरेंद्र महाले, पद- वरिष्ठ लिपिक , प्रभारी
कार्यभार सहा. आयुक्त कर विभाग मालेगाव ,वर्ग -.३. महानगरपालिका, मालेगाव, वय ५१,वर्षे, रा. प्लॉट नंबर 41, वर्धमान नगर, एलआयसी ऑफिस, कॅम्प, मालेगाव.
*लाचेची मागणी- ३३,००० /-
*लाच स्विकारली- ३३,०००/-
*हस्तगत रक्कम- ३३,०००/-
*लालेची मागणी – दि.१३/०६/२०२४
*लाच स्विकारली – दि.२१/०६/२०२४
तक्रार:– यातील तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून मालेगाव महानगरपालिके अंतर्गत गटार बांधकामाचे टेंडर तक्रारदार यांच्या भावाचे नावे घेतलेले होते त्याप्रमाणे काम पूर्ण करून केलेल्या नाला बांधकामाचे बिल मंजूर करण्याकरिता आलोसे यांना भेटले असता आलोसे हे मालेगाव महानगरपालिकेत आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक असल्याचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव टाकून त्यांचे नाला बांधकामाचे बिल मंजूर करून देतो असे सांगून बिल मंजूर झाल्यावरती स्वतःसाठी व इतरांसाठी बक्षीस म्हणून चार टक्के प्रमाणे पैसे द्यावे लागतील असे सांगितलेले होते. त्याप्रमाणे तक्रार यांची नाला बांधकामाचे बिल मंजूर झाल्या नंतर तक्रारदार हे आलोसे यांचे भेटी करता गेले असता दिनांक १३/०६/२०२४ रोजी आलोसे श्री सचिन सुरेंद्र महाले यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष तक्रारदार यांच्यावर प्रभाव टाकून स्वतःसाठी व इतरांसाठी लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले होते त्याप्रमाणे आज दिनांक २१/०६/२०२४ रोजी आलोसे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचे कडून ३३,०००/- रुपये मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली
म्हणून पंचां समक्ष त्यांना ताब्यात घेण्यात आले असून किल्ला पोलीस स्टेशन, मालेगाव येथे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
- आलोसे यांचे सक्षम अधिकारी- आयुक्त, महानगरपालिका मालेगाव.
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- सापळा व तपास अधिकारी – श्रीमती गायत्री मधुकर जाधव, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.
- सापळा पथक – पोलीस हवालदार संदीप वणवे, पोलीस हवालदार ज्योती शार्दुल, वाहन चालक पोलीस हवालदार परशुराम जाधव.