मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहकार विभागामार्फत जीडीसी अॅण्ड ए आणि सीएचएम परीक्षा मे २०२३ मध्ये घेण्यात आला होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुंबई केंद्रामधून परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (३), पश्चिम उपनगरे, मुंबई यांच्या कार्यालयात प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र घेऊन जावे, असे आवाहन जिल्हा केंद्र प्रमुख तथा जिल्हा उपनिबंधक राजेंद्र वीर यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांनी गृहनिर्माण भवन, तळमजला, कक्ष क्र. ६९, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१ येथील कार्यालयात कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या आत त्यांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र स्वतः उपस्थित राहून प्राप्त करुन घ्यावेत. एक महिन्यानंतर उर्वरित परीक्षार्थींना त्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना नोंद केलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे त्यांचा निकाल पाठविण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.