इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला आहे.
कथित दारू घोटाळा प्रकरणात न्यायालयाने आप प्रमुखांच्या जामीनाला अंतिम आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. हायकोर्टाने वकिलांना सोमवारपर्यंत लेखी सबमिशन दाखल करण्यास सांगितले आहे.