इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील MH-CET परिक्षांमधील गोंधळाबद्दल प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि मिंधे राजवट विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल अनभिज्ञ आहे हे दिसतंच आहे, पण बहुधा त्यांना परीक्षा आयोजित करणाऱ्या एजन्सीमध्येच स्वारस्य आहे आणि ॲाब्जेक्शन्समधून पैसे कमवायचे आहेत. त्यांना फक्त खोके आणि धोके एवढंच कळतं!
विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत.
१) फेरपरीक्षा नको पण पारदर्शकता हवी.
२) विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका हव्या आहेत.
३) विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आणि टॉपर्स जाणून घ्यायचे आहेत, फक्त पर्सेंटाइल नाही.
- CET चा १ पेपर २४ बॅचमध्ये घेण्यात आला.
- १४२५ आक्षेप घेण्यात आले आणि प्रत्येक आक्षेपासाठी, CET सेल ₹१००० आकारते आहे.
- सीईटी सेलने पेपर्समध्ये ५४ चुका मान्य केल्या आहेत.
- त्यातील काही प्रश्नांमध्ये तर “MCQ मधील कोणताही पर्याय बरोबर नव्हता” अशाही चुका होत्या.
- हे पेपर कोणी सेट केले?
- ह्या अनागोंदी कारभारासाठी आयुक्तांना निलंबित का करू नये?
- पर्सेंटाईल कसे ठरवले जाते?
- मार्क्स का सांगितले नाहीत आणि उत्तरपत्रिका खुल्या का केल्या नाहीत?
- कुठला पेपर सोपा आणि कुठला कठीण हे कोण ठरवतो?