इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचे जालन्यातील वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसापासून उपोषण सुरु आहे. या आंदोलनाचे कौतुक भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून आंदोलन कसे करावे सालस अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटने बद्दल आदर ठेवणे शिकायचे असेल तर वडी गोदरी मध्ये पहा…वाह रे वाह..
कालही पंकजा मुंडे यांनी या आंदोलनावरुन पोस्ट टाकत म्हटले होते की, राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे.