इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तुम्ही आम्हाला खिंडीत पकडता, डाव साधता. मी ९ मंत्री पाडणार. १३ तारखेनंतर सांगतो असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी दिल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयातून पत्रकार परिषद घेत त्यांनी हा इशारा दिला.
जालन्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे देखील उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांची आज सरकारसोबत बैठक पार पडणार आहे. त्याअगोदर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. मराठ्यांच्या सापडलेल्या नोंदी रद्द करा म्हणतात. मी माझ्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले तुम्ही ओबीसी नेत्यांच्या दबावाला पडून आमच्यावर अन्याय करणार असे दिसते. तुम्ही सरकार म्हणून फूस लावता. त्यांना आंदोलनासाठी तुम्हीच उभे करता, मी तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही. तो येवलावाला चाब्रा आहे. त्याला राजकीय आयुष्यातून उठवेल. गाड्या पुरवितो. आमच्या आमच्यात लावून देतो. लढणाऱ्या लोकांनाही कळत नाही. त्यांना राज्यातील पडलेली गँग साथ देतेय असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी संगितले ओबीसी नेते एकत्र आले. नोंदी रद्द करा म्हणतात ते आम्हाला चालणार नाही. कुणबी मराठे एकच आहेत, हे लक्षात घ्या. यांनी कितीही बदनाम केले तरी मागे हटू नका. नोंदी रद्द करा म्हणतात. सहन करणार नाही. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवावी हा येवलावाल्याचा प्लॅन आहे. मात्र हे जास्त चालणार नाही. मराठा एक आहे. सिद्ध झाले आहे. प्रत्येकाला कळतंय की, मी मराठ्यांच्या लेकरासाठी लढतोय.