इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
१८ व्या लोकसभा निवडणुकांच्या यशस्वी पूर्ततेनंतर निवडणूक आयोगाने आता हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीकरता मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण सुरू केले असून यासाठी १ जुलै २०२४ पात्रता तारीख म्हणून निश्चित केली आहे. तीन राज्यांतील विद्यमान विधानसभांचा कार्यकाळ अनुक्रमे 03.11.2024, 26.11.2024 आणि 05.01.2025 रोजी संपत आहे आणि या विधानसभांच्या निवडणुका त्यांच्या मुदती पूर्ण होण्यापूर्वी आयोजित करणे आवश्यक आहे.
याशिवाय, मतदारसंघांच्या सीमांकनानंतर नवीन सदन स्थापन करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील घेतल्या जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरच्या नागरिकांचा मोठा सहभाग पाहता, निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024 पात्रता तारीख धरून जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाच्या मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण करण्याचे निर्देशही दिले आहेत.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पात्रता तारीख 1 जानेवारी 2024 धरून मतदार याद्यांचे शेवटचे विशेष सारांश पुनरिक्षण करण्यात आले. निवडणूक कायदे (सुधारणा) कायदा, 2021 द्वारे लोकप्रतिनिधी कायदा, 1950 च्या कलम 14 मध्ये सुधारणा केल्यानंतर आता एका वर्षात चार पात्रता तारखांची तरतूद उपलब्ध आहे. त्यानुसार, सर्व पात्र आणि नावनोंदणी न झालेल्या नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवण्याची पुरेशी संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि त्याद्वारे आगामी निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळावी यासाठी आयोगाने हरयाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात 01.07.2024 पात्रता तारीख निश्चित करून मतदार याद्यांची दुसरी विशेष सारांश पुनरावृत्ती (एसएसआर) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अचूक , सर्वसामावेशक आणि अद्ययावत मतदार याद्या हा मुक्त, निर्भय आणि विश्वासार्ह निवडणुकांचा पाया आहे, यावर निवडणूक आयोगाची ठाम निष्ठा आहे. मतदार यादीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी, आयोग प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यापूर्वी सखोल पुर्नरिक्षण -पूर्व उपक्रम राबवण्यावर विशेष भर देत आहे.
मतदारांच्या सुविधेसाठी अगदी लहान वस्तीच्या जवळ मतदान केंद्रे उभारण्यासाठी आणि मतदानाचा हक्क बजावण्यात बाधा ठरणाऱ्या भीती, मौन किंवा इतर घटकांची शक्यता निष्क्रिय करण्यासाठी निवडणूक आयोग मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच हेतूने,