नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील मायक्रोपेंट कंपनीच्या आवारातील झाडावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाबासाहेब रामभाऊ दुधोंडे (३६ रा.अंबड) असे मृत कामगाराचे नाव आहे. दुधोंडे मायक्रोपेंट कारखान्यात कामास होता. गेल्या शनिवारी (दि.१५) दुपारी लंचब्रेकमध्ये तो अंब्याचा झाडावर चढला असता ही घटना घडली. झाडावरील अंबे तोडत असतांना अचानक फांदी तुटल्याने दुधोंडे जमिनीवर कोसळला होता.
या घटनेत त्याच्या डोक्यास मार लागल्याने त्यास परिसरातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. गुरूवारी (दि.२०) प्रकृर्ती खालवल्याने त्यास मेहुणे मधुकर गायकवाड यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सावले करीत आहेत.