नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज ठिकठिकाणी योगा डे साजरा केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी योगा दिवसा निमित्त चक्क थंडगार बर्फाच्या लादीवर ४५ मिनिटात ५१ योगासने व सूर्यनमस्कार घातले. कोणी झाडावर, कोणी पाण्यात योग करतांना आपण पाहिले असेल मात्र मोकळ यांनी थंडगार बर्फाच्या लादीवर केलेले योगसने सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.