इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने आयसीसी टी २० वर्ल्ड कपमध्ये सुपर ८ फेरीत अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने पहिले फलंदाजी करुन अफगाणिस्तान संघाला विजयासाठी १८२ धावांचे आव्हान दिले होते. पण, अफगाणिस्तान संघ २० ओव्हरमध्ये १३४ धावावंरच आऊट झाला.
या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून १८१ धावा केल्या. सूर्यकुमार यादव ५३, हार्दिक पंड्या याने ३२ धावा केल्या. तर विराट कोहलीने २४, ऋषभ पंत २०, रोहित शर्माने ८, रवींद्र जडेजा ७ तर शिवमने १० धावा केल्या. अक्षर पटेलने १२ धावा केल्या. तर अर्शदीप सिंहने २ नाबाद धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी आणि राशिद खान या दोघांनी ३-३ विकेट्स घेतल्या. तर नवीन उल हक याच्या खात्यात १ विकेट गेली.
आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची आपली भूमिका चोखपणे पार पाडली. भारतीय संघाकडून अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या.