नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – CBI ने UGC NET-2024 परीक्षेशी संबंधित प्रकरणात केंद्रीय शिक्षण विभागाकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे अज्ञात आरोपींविरुद्ध १२०B आणि ४२० IPC अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या तक्रारीत विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर (14C) च्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट ॲनालिसिस युनिट कडून १९ जून रोजी इनपुट मिळाले होते जे UGC नेटची अखंडता – नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे १८ जून रोजी देशातील विविध शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये आयोजित केलेल्या २०२४ परीक्षेत तडजोड झाली असावी.
याअगोदर UGC NET-2024 ही परीक्ष रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर आता गुन्हा दाखल केला आहे.