इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालु्क्यात आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या महिलेने विहिरीत उडी मारण्यापूर्वी आपल्या पतीला व्हिडिओ कॅाल करून लेकीचे शेवटचे तोंड पाहा असे सांगितले होते.
भाग्यश्री व्यंकट हालसे (२६) व समीक्षा व्यंकट हालसे (५) अशी या दोघांची नावे आहेत. भाग्यश्रीला आपल्या दोन्ही मुलांना सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या इंग्रजी शाळेत शिकवण्याची इच्छा होती. तिने तसा हट्ट पतीकडे धरला होता; परंतु परिस्थितीची जाणीव करून देत पती तिची वेळोवेळी समजूत काढत असे. पण, भाग्यश्री नैराश्यात गेल्यामुळे तीने टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण मायलेकींचा मृत्यू झाला होता.