इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
NEET परीक्षेत पेपरफुटी आणि फसवणुकीमुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी या विद्यार्थ्यांबरोबर राहुल गांधी यांनी संवाद साधला.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, अशा लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य मोदी सरकारमुळे टांगणीला लागले आहे. येत्या काळात पेपरफुटी आणि परीक्षेतील फसवणुकीविरोधात काँग्रेस पक्ष देशभरात आंदोलन करणार असून तरुणांना न्याय मिळवून देणार आहे.
या भेटीअगोदर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.