नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय महामार्गावरील संकेत चिन्हांच्या उपलब्धतेत सुधारणा करून रस्ता सुरक्षा वाढवण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित उपायांचा लाभ घेण्याकरिता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार (एनसीटी ) द्वारे स्थापन केलेल्या इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (दिल्ली) या तंत्रज्ञान विद्यापीठासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
कराराचा एक भाग म्हणून, IIIT दिल्ली निवडक राष्ट्रीय महामार्गांवरील रस्त्यांच्या चिन्हांच्या उपलब्धता आणि स्थितीशी संबंधित प्रतिमा आणि इतर संबंधित डेटा गोळा करण्यासाठी सर्वेक्षण करेल. या प्रकल्पांतर्गत समाविष्ट करण्यात येणारी तात्पुरती लांबी सुमारे 25,000 किमी असेल. सर्वेक्षणांद्वारे संकलित केलेल्या डेटावर आयआयआयटी दिल्लीद्वारे रस्त्यावरील चिन्हांची अचूक ओळख आणि वर्गीकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमाद्वारे प्रक्रिया केली जाईल. परिणामांवर आधारित सर्वेक्षण अहवालामध्ये वर्गीकरणासह विद्यमान रस्त्यांच्या चिन्हांची जिओ-स्टॅम्प केलेली यादी, रस्त्यांच्या चिन्हांची विस्तृत संरचनात्मक स्थिती आणि इतर सहायक डेटा समाविष्ट असेल.
ही संस्था रस्त्यावरील अंतराचा अभ्यास देखील करेल जो संबंधित कराराच्या मंजूर रस्ता संकेत चिन्ह योजनेनुसार सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि रस्ता संकेत चिन्हांची आवश्यकता यामधील फरकाचे मूल्यांकन करून केला जाईल. हे अंतराचे अध्ययन अतिरिक्त सुरक्षा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हाय-स्पीड कॉरिडॉरशी संबंधित नवीनतम कोडल तरतुदींनुसार आवश्यकतेचा समावेश करेल.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) मधील संधींचा उपयोग करून, सर्व राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांसाठी नवकल्पना स्वीकारून आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते सुरक्षा वाढवणे हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा उद्देश आहे.