नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ३२ ग्रॅम वजनाचे व सुमारे १ लाख ६० हजार रूपये किमतीचे मॅफेड्रॉन शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने हस्तगत केले आहे. या प्रकरणात एमडी या अंमली पदार्थाची विक्री करणारे दोन तरूणाना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार कारंजा भागात बुधवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास दोन तरूण एमडी या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवार कारंजा कडून रेड क्रॉस सिग्नल कडे जाणा-या मार्गावर सापळा लावण्यात आला होता. बालाजी एजन्सी समोरील अॅक्सीस बँक भागात पोलीसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या असता त्यांच्या अंगझडतीती मॅफेड्रॉन हा अमलीपदार्थ मिळून आला.
धिरज धनराज चांदनानी (२४ रा.गोगटे बंगला, श्रीरामवाडी एमजीरोड) व रोहित सुनिल अहिरराव (२७ रा.सुयश अपा.रामकृष्णनगर शांतीनगर मखमलाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित एमडी विक्रेत्यांची नावे आहेत. ही कारवाई पथकाचे हवालदार देवकिसन गायकर व अंमलदार चंद्रकांत बागडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
संशयितांच्या ताब्यातून ३२ ग्रॅम वजनाचा व सुमारे १ लाख ६० हजार रूपये किमतीचे एमडी जप्त करण्यात आले असून त्यांनी ते कोठून आणले याबाबत तपास सुरू आहे. संशयितांना मुद्देमालासह सरकारवाडा पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून याप्रकरणी हवालदार देवकिसन गायकर यांनी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई आयुक्त संदिप कर्णिक,उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्ष जयराम पायगुडे,सहाय्यक निरीक्षक हेमंत नागरे,उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड,भोई, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, हवालदार किशोर रोकडे,ताजणे,गायकर पोलीस नाईक योगेश चव्हाण,जगझाप,कोल्हे,दत्ता चकोर,अंमलदार बाळा नांद्रे,राऊत,बागडे,विठ्ठल चव्हाण भड आदींच्या पथकाने केली.