नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्नीचे व मुलांचे स्वतंत्र वेगळे रेशनकार्ड तयार करण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच घेतांना सुरगाणा तहसिल कार्यालयातील सेतु कर्मचारी सीताराम बनश्या पवार हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
या कारवाई बाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचेकडे सेतु कर्मचारी याने तक्रारदार यांचे, पत्नीचे व मुलांचे स्वतंत्र वेगळे रेशनकार्ड तयार करण्याकरिता ५ जून रोजी दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम २० जून रोजी पंच साक्षीदारा समक्ष तहसिल कार्यालय,सुरगाणा, नाशिक येथील सेतू कार्यालयात स्वीकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून यातील आरोपी यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरूष वय-३५
आरोपी श्री.सीताराम बनश्या पवार वय ३५ वर्षे, व्यवसाय- सेतु कर्मचारी, तहसिल कार्यालय, सुरगाणा , नाशिक रा. रानविहिर,पो. सतखांब, ता. सुरगाणा , नाशिक
*लाचेची मागणी- २,०००/-
*लाच स्विकारली- २,०००/-
*हस्तगत रक्कम- २,०००/-
*लालेची मागणी – दि. 05/०6/2024
*लाच स्विकारली – दि.20/06/2024
तक्रार:-तक्रारदार यांचेकडे आरोपी याने तक्रारदार यांचे, पत्नीचे व मुलांचे स्वतंत्र वेगळे रेशनकार्ड तयार करण्याकरिता दिनाक 05/06/2024 रोजी 2000/- रुपयाची लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम दिनाक 20/06/2024रोजी पंच साक्षीदारा समक्ष तहसिल कार्यालय,सुरगाणा, नाशिक येथील सेतू कार्यालयात स्वीकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून यातील आरोपी यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा अधिकारी – श्रीमती वैशाली पाटील, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक मोबा.नं.७७२२०००९४९
*सापळा पथक*
पोहवा/शरद हेंबाडे
पोहवा/ प्रफुल्ल माळी
चापोहवा/संतोष गांगुर्डे
चापोना/परशुराम जाधव
पो.ना.विलास निकम
पो.ना. अविनाश पवार