इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये मित्रपक्षांमध्ये एकमेकांवर आरोप सुरु असल्याचे सत्र अद्याप थांबले नाही. गेल्या काही दिवसात पराभवाची कारणे शोधतांना एकमेकांवर ब्लेम केले जात आहे. आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी तर विधानसभेच्या १०० जागा हव्या, जर दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळावर २८८ जागा लढू असे म्हणत भाजपला इशारा दिला आहे. उध्दव ठाकरे लोकसभेत २१ जागा लढले मग भाजपने आम्हाला २१ जागा का दिल्या नाहीत याचे उत्तर भाजपकडे काय असा सवालही त्यांनी विचारला आहे.
बुधवारी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या मेळाव्यात त्यांनी भाजपच्या सर्व्हेवरुन चिमटे काढले. तर अजित पवारांना त्यांनी उशीरा आले असते तर असे सांगत खापर फोडण्याचे काम केले. कदम यांच्या वक्तव्यावर भाजपने मात्र बोलणे टाळले आहे. त्यांचे ते वैयक्तीक मत आहे असे सांगून फारसे महत्त्व दिले नाही.
गेल्या काही दिवसात महायुतीमधील बेबनाव उघडपणे समोर येऊ लागल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्था आहे. विधानसभेत युती होईल की नाही याबाबत कार्यकर्तेही साशंक आहे.