इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात राऊस अव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला परवानगी दिली आणि त्यांना १ लाख रुपयांच्या जामीनावर जामीन मंजूर केला. उद्या ते जेलमधून बाहेर येऊ शकता.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना २१ दिवसाच्या जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा तिहार तुरुंगात सरेंडर केले. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केले. त्यानंतर ते पुन्हा २० दिवस तुरुंगात राहिले. त्यानंतर पुन्हा त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. एकुण ७० दिवसाच्या आसपास ते दोन टप्यात तुरुंगात होते.त्याला त्रास होऊ शकतो, पराभूत होऊ शकत नाही.
जामीन मंजूर झाल्यानंतर आम आदमी पार्टीने म्हटले आहे की, भाजपच्या ईडीचे सर्व आक्षेप फेटाळून न्यायालयाने जामीन मंजूर केले आहे.