नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणूक आयोगाने १ जून २०२४ रोजी जारी केलेल्या एसओपीच्या (मानक कार्यप्रणाली) अनुषंगाने, लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ आणि राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएमची बर्न्ट मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासणी/पडताळणीसाठी अनुक्रमे एकूण ८, आणि ३ अर्ज प्राप्त झाले आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाने १ जून २०२४ च्या आपल्या आदेशाद्वारे अर्ज प्रक्रिया, तपासल्या जाणाऱ्या युनिट्ससाठीचे प्रोटोकॉल, तपासणी/पडताळणी प्रक्रियेसाठी सुरक्षा आणि नियंत्रण आणि आवश्यक कागदपत्रे, याबाबतचे तपशीलवार प्रशासकीय एसओपीच्या जारी केले होते. (SOP link: https://tinyurl.com/yxtxys7u ).
या एसओपी अनुसार, संबंधित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (सीईओ) उत्पादकांना, आयोगाला सूचित केलेल्या अर्जदारांची एकत्रित यादी, निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत म्हणजेच, 4 जुलै 2024 पर्यंत कळवणे आवश्यक आहे. सीईओंनी यापूर्वीच वेळापत्रकाच्या 15 दिवस आधी उत्पादकांना ही सूचना दिली आहे.
जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार आणि कायदेशीर स्थितीनुसार, सीईओंद्वारे संबंधित उच्च न्यायालयाच्या निबंधकांकडून, वरील प्रमाणे निवडलेल्या, संबंधित मतदारसंघात दाखल केलेल्या निवडणूक याचिकांच्या स्थितीची तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया 4 आठवड्यांच्या आत सुरू करता येईल. निवडणूक याचिका (EP) दाखल करण्याची मुदत, सध्याच्या निवडणुकीच्या आवर्तनामध्ये, म्हणजेच निकाल जाहीर झाल्यापासून 45 दिवस इतकी आहे. ईव्हीएम युनिट्सची बर्न्ट मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासण्यासाठी आणि पडताळणीसाठी पद्धती आणि टप्पे ठरवणारी तांत्रिक मानक कार्यप्रणाली आयोगाकडून निवडणूक याचिका कालावधी संपण्यापूर्वी योग्य वेळी जारी केली जाईल.
संबंधित सीईओंकडून ईपी (EP) ची सद्यःस्थिती प्राप्त झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत उत्पादक ईव्हीएम तपासणी आणि पडताळणीसाठी वेळापत्रक जारी करतील. निवडणूक याचिकेच्या स्थितीची स्थिती समजल्यावर 4 आठवड्यांच्या आत युनिट्सची तपासणी आणि पडताळणी सुरू होईल.