इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्ली: NEET च्या मुद्द्यावर आणि UGC-NET परीक्षा रद्द करण्यावर, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारवर थेट हल्ला केला. यावेळी ते म्हणाले की, हे एक राष्ट्रीय संकट आहे, हे एक आर्थिक संकट आहे, ते शैक्षणिक संकट आहे, संस्थात्मक संकट आहे. पण मला काहीच प्रतिसाद दिसत नाही. बिहारबाबत आम्ही म्हटले आहे की, ज्यांनी पेपर लीक केला आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
यावेळी ते म्हणाले केंद्र सरकारचे या प्रकरणावर मौन आहे कारण पंतप्रधान हतबल आहेत. सध्या, पंतप्रधानांचा मुख्य अजेंडा (स्पीकर) निवडणे आहे. ते त्रस्त आहेत. त्यांच्या सरकारबद्दल आणि स्पीकरबद्दल. पंतप्रधानांना अशाप्रकारे सरकार चालवण्याची धडपड करावी लागणार आहे. या निवडणुकीत मोदींचा नुकसान झाले आहे, जर वाजपेयी किंवा मनमोहन सिंग असते तर ते टिकू शकले असते कारण त्यांच्यात नम्रता, आदर आणि सलोखा होता.
यावेळी त्यांनी आता देशात कोणीही मोदी यांना घाबरत नाही. आधी छाती ५६ इंच होती, पण आता मी संख्या देऊ शकत नाही, पण ३०-३२ झाली आहे. त्यांच्या कामाचा मार्ग म्हणजे लोकांना घाबरवणे, त्यांना धमकावणे, आता ती भीती नाहीशी झाली आहे. आता ती भीती संपली आहे, त्यांच्या पक्षातही अडचणी आहेत, त्यांच्या पालक संघटनेतही अडचणी आहेत, म्हणून मला सांगायचे आहे की नरेंद्र मोदींची संकल्पना विरोधकांनी संपवली आहे.