मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभेच्या निकालानंतर महायुतीमधील मित्रपक्षांध्येच ब्लेम गेम सुरु झाला आहे. एकमेकांवर आरोप करुन कोणामुळे पराभव झाला हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या विरोधात वक्तव्य केले. त्याचे प्रत्त्युत्तर आज अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिले आहे.
बुधवारी शिवसेनेच्या मेळाव्यात मागुन आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं असे सांगत चिमटा काढला. त्यानंतर मिटकरी यांनी रामदास कदमजी आपण जोरात बोललात “मागुन आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं” माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका..