इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई येथे ठाकरे गट व शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या दोन्ही मेळाव्यासाठी लाखो कार्यकर्ते रेल्वे, बस व खासगी वाहनाने मुंबईत गेले होते. हा मेळावा झाल्यानंतर परतीच्या प्रवासात शिंदे गटाच्या तीन बसचा मुंबई – आग्रा महामार्गावर शहापूर जवळ अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी ८ किरकोळ जखमी झाले आहे. मध्यरात्री २ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.
या अपघाता बाबत समजेलली माहिती अशी की, पहिला अपघात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड -सोयगाव विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते प्रवास करत असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये व ट्रकमध्ये झाला. त्यानंतर मागूण येणा-या इतर दोन बसेसही एकमेकांवर धडकल्या, यात ट्रक आणि बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायर तोडून उड्डाणपालुाखालील रस्त्यावर कोसळल्या.
या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई कडून नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवर कळंबे गावचे हद्दीत ब्रिजवर हा अपघात घडला. या घटनेची चालकांने दिलेली माहिती अशी की दसरा मेळावा संपवून मुंबई ते सिल्लोड सोयगाव संभाजीनगर असा परतीचा प्रवास करताना शहापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कळंबे गावच्या ब्रिजवर बस क्रमांकMH 20 BL 2170 या बसला पाठीमागून येणारा ट्रक क्रमांक MH 18 BG 0010 भरधाव वेगात येऊन ठोकर मारल्याने नमूद बस डिवाइडरवर चढली. त्या पाठीमागून येणारी बस क्रमांक MH 20 BL 2006 ने ट्रकला धडक मारून रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली व बस क्रमांक MH 20 BL 2015 डिवाइडर वर चढल्याने अपघात झाला. या अपघातात २ गंभीर जखमी ८ किरकोळ जखमी झाले.
गंभीर जखमीमध्ये मदन दयाराम भाबर (१८) रा. धार मध्यप्रदेश, विजय मोतीराम तुपसुंदर रा. पैठण बस चालक असून किरकोळ जखमींमध्ये
मुस्तफा मोहम्मद नूर (२८) राहणार संभाजीनगर, शब्बीर शेख राहणार सिल्लोड चहा अफसर बाबू शहा (४०) राहणार सिल्लोड , इमरान खान शौकत खान (२१) राहणार सिल्लोड, अवेद मतीन अहंमद (३२) राहणार संभाजीनगर, बालाजी गंगाराम निशाने (३४) राहणार संभाजीनगर, हरिभाऊ दुधे (३९) राहणार सिल्लोड, ईश्वर लक्ष्मण ढोबे (४३) राहणार सिल्लोड.