नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यार्थ्याची पास काढण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकने पास केंद्राच्या संख्येत वाढ केली आहे. विद्यार्थ्याची गैरसोय होवू नये याकरिता शहराच्या विविध भागात सद्यस्थितीत एकूण ७ पासकेंद्र सुरू करण्यात आले आहे. पुढील प्रमाणे –
१ ) के. टी. एच. एम महाविद्यालये – १ पास केंद्र
२ ) निमाणी बसस्थानक – २ पास केंद्र
३ ) सातपूर शिवाजी नगर मनपा शाळा – १ पास केंद्र
४ ) नाशिकरोड बसस्थानक – १ पास केंद्र
५ ) सिटीलिंक मुख्य कार्यालय – २ पास केंद्र.