नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – म्हसरूळ हद्दीतील खुनाच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास भारत नगर मध्ये दोन मित्रांच्या वादात एकाची निघृण हत्या झाली. परवेझ शेख असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी एकास अटक केली आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील कायदा सुव्यवस्था कमालीची ढासळली असून, टवाळखोर, वाहने फोडणे या प्रकारामुळे नागरीक दहशतीखाली वावरत आहे, मयत आणि आरोपी मित्र असल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी मोबाईल गहाण ठेवण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे कळते.