नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बकरी ईदनिमित्त कत्तल होणा-या १२४ बक-यांचा जीव जैन धर्मातील एका तरुणाने वाचवला. मुस्लिम बांधवांचा पेहराव करुन त्याने १२४ बकरे खरेदी केल्या. विशेष म्हणजे त्यासाठी त्याने १५ लाखांचा निधीही गोळा केला. त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जैन गुरू संजीव यांच्यामुळे ही योजना आखली गेली.
खरेदी केलेल्या या बक-या जामा मशिदीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या चांदणी चौकातील जैन मंदिरात आणण्यात आल्या. त्यामुळे नया जैन मंदिरात कसाईच्या तावडीतून वाचलेल्या बकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी येथे गर्दी झाली होती. यावेळी काहींनी बक-यांच्या चाऱ्यासाठी पैसेही दान केले.
गुरू संजीव यांच्यामुळे ही योजना आखली गेली. त्यांनी २८ वर्षीय चिराग जैनला फोन केला. त्यानंतर शक्य तितक्या वाचवण्याची योजना आखली गेली. १५ जूनच्या संध्याकाळी २५ जणांची टीम तयार करण्यात आली. आर्थिक योगदानासाठी व्हॉट्सॲप संदेशही प्रसारित करण्यात आला. त्यानंतर या बक-या खरेदी करुन त्यांचा जीव वाचवण्यात आला.