मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मी हिंमत हारणार नाही. काही हारजीत होत असते. निवडणूक हरलो तर उद्या जिंकेल. पण हिंमत हरलो तर जिंकू शकणार नाही. हिंमत हरणार नाही. तुम्हाला हरू देणार नाही. काही ठिकाणी निवडणूक जरूर हरलो असले. जिव्हारी लागला पराभव पण त्या पराभवाचा वचपा विजय मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेतो असे उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचाही समाचार घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण पराभवाचा बदला घ्यायचा असेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून बुधवारी मुंबईत षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.
यावेळी ते म्हणाले की, जगाने दाखवून दिलं भाजप अजिंक्य नाही. मोदी अजिंक्य नाही. मोदींचे पाय मातीचेच आहे हे इतिहासात लिहिलं जाईल. या मेळाव्यात त्यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला. पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतात जाऊ द्या ना घरी आता वाजवले की बारा. वाजवले की बारा आता जाऊ द्या ना. ते म्हणतात नाही, और सत्यानाश करो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.