नांदगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगांव तालुक्यात व जळगांव जिल्ह्यात खळबळ उडवून देणा-या खुनाच्या घटनेचा नांदगांव पोलिसांनी अवघ्या २४ तासात तपास करुन संशयीत आरोपिंना बेड्या ठोकण्यात यश आले असून या खुनाच्या कटात मयत दिपक सोनवणे त्याची बायको, मेहुणी, मेहुणीचा मुलगा, साडू व इतर असे सहा जण कटात सामील असून यात दोन महिलांचा समावेश असून यातील चार संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे .
नांदगांव तालुक्यातील जातेगांव येथील मोठा महादेव मंदिरावर जाणा-या मार्गावर अपघाताचा बनाव करुन दिपक गोण्या सोनवणे वय ५४. रा.मुळगांव वाघोरे ता.अमळनेर जि.जळगांव. यास त्याची पत्नी, मेहुणी, मेहुणीचा मुलगा, साडू तसेच सोनवणे आणि मोरे परीवारातील सहा जाणांच्या संगणमताने कट रचून मयतास जातेगांव येथील डोंगरावर निर्जन ठिकाणी आणून राञीच्या वेळी दगडाने व लाकडी दांड्याने डोक्याला गंभीर मार देऊन जिवे ठार मारले. काम फत्ते झाल्यावर तेथून संशयीत आरोपिंनी पोबारा केला.
खुनाच्या कटात सामील असलेल्या सहा व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून यात मयताची पत्नी व मेहुणी ,साडू यांचा समावेश आहे यातील चार संशयीताना अटक करण्यात आले आहे, घटनेतील मयत दिपक सोनवने हा मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदावर नोकरीला होता, त्याचे घरात संशयावरून नवरा बायकोत नेहमी भांडणे होत असे त्या भांडणाचे पर्यवसान आखेर खुनात झाले. सर्व संशयीत आरोपिंनी कट रचून दिपक सोनवणे यास देव दर्शनाच्या निमित्ताने जातेगांव येथे बोलवले. नंतर यातील मुख्य संशयीत आरोपी संदीप(रमेश) महादु लोखंडे रा.शेजवळ ता. मालेगांव, साईनाथ बाबुलाल सोनवणे, रा.पिंप्रिहावेली,ता. नांदगांव जि नाशिक, अनिता चंद्रकांत मोरे रा.म्हसदे ता. पारोळा, पल्लवी दिपक सोनवने रा.वाघोरे ता. अमळनेर, नितीन चंद्रकांत मोरे रा. म्हसदे जि जळगांव यांनी दिपक सोनवणे यास ठार मारले.
या प्रसंगी मध्यरात्रीच्या वेळेला दिपकच्या प्रेयसीने महादेवाच्या डोंगरावर बोलविले व तेथे इतरांच्या मदतीने दिपकचे कांड केले. या घटनेचा नांदगांव पोलिसांनी अवघ्या २४ तासात आरोपिंना ताब्यात घेतले. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेतील मयताची पत्नी, मेहुणी साडू महिलेचा प्रियकर या कटात सामील झाले. या सर्व घटनेचा तपास कामी जिल्हा पोलिस प्रमुख विक्रम देशमाने अप्पर पोलिस प्रमुख अनिकेत भारती,पो उप अधिक्ष बाजीराव महाजन,यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी ,पोलिस उपनिरीक्षक संतोश बहाकर,पोलिस भारत कांदळकर, विनायक जगताप, भास्कर बस्ते, अनिल शेरेकर, दत्ता सोनवणे, श्रीखंडे, सचिन मुंढे, कैलास परदेशी, साईनाथ आहेर, हेमंत गिलगिले, प्रदीप बहिरम यांच्या टिंमने या घटनेचा तपास केला.









