पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने पुण्यात आत्महत्या केली. प्रसाद देठे असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बार्शीचा आहे. पुण्यातील एका खासगी कंपनीत तो नोकरीला होता.
मराठा आरक्षणासाठी त्याने आज सकाळी आत्महत्या केली. आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत देठे याने मनातील व्यथा मांडली आहे. ‘फक्त मराठा आरक्षण मिळावे’, याच हेतूने आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद करून आत्मत्येला कोणीही जबाबदार नाही, असे म्हटले आहे. देठे यांच्या आत्महत्येने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वीही त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. ‘जरांगे पाटील जिंदाबाद, लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे’ आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील,’ असे त्याने म्हटले होते.