नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या वरिष्ठ लिपीक कैलास शेळके यांना ३ हजार रुपये लाच घेणे चांगलेच महागात पडले आहे. न्यायालयाने त्यांना भ्रप्रअ. १९८८ चे कलम ७ अन्वये ३ वर्ष सक्तमजुरी ५ रूपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास तसेच कलम १३ अन्वये ४ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ७ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. २२ मार्च २०१६ मधील हे प्रकरण असून आज न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी कैलास भिकाजी शेळके यांनी तक्रारदार अशोक बकोरे यांच्याकडे वडिलांच्या नावे निवासी गाळा २२० गाळे अल्प उत्पन्न गट सिविल हुडको गाळा क्रमांक ६८४ अ.नगर हा तक्रारदार याचे नावावर ट्रान्सफर (अभिहस्तांतरण) करण्यासाठी २२ मार्च २०१६ रोजी तीन हजार रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम पंचासमोर स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. याप्रकरणी नाशिक येथील मुंबई नाका पोलीस ठाणे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ ,१३(१)( ड), सह १३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश – ७ जे. एम. दळवी यांचे समोर झाली. सदर खटल्याचे कामकाज सचिन गोरवाडकर, सरकारी अभियोक्ता यांनी पाहिले. याप्रकरणा पोलीसांनी केलेला तपास व महत्वाच्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने आरोपी कैलास भिकाजी शेळके यास १९ जून रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे ७ अन्वये दोषी धरून ३ वर्ष सक्तमजुरी शिक्षा व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा. दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा तसेच कलम 13 अन्वये ४ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ७ महिने सश्रम कारावास शिक्षा सुनावली आहे.
दोषसिध्दी अहवाल
CONVICTION REPORT
युनिट – नाशिक
गुन्हा नोंद क्रमांक – पो.स्टे. मुंबई नाका, गु.र.न 3063/16
आरोपी – कैलास भिकाजी शेळके, वय- 54 वर्ष, वरिष्ठ लिपिक नासिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ कार्यालय, गडकरी चौक, नाशिक राहणार- श्रीनाथ कृपा, हरिकुलनगर, पंचक जेलरोड, नाशिक (वर्ग-3)
मागणी केलेच्या लाचेची रक्कम – 3000/- रूपये.
शिक्षा – भ्र. प्र. अ. सन 1988 चे कलम 7 अन्वये 3 वर्ष सक्तमजुरी 5000/- रूपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावास
तसेच कलम 13 अन्वये 4 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा 5000/- रुपये दंड, दंड न भरल्यास 7 महिने सश्रम कारावास.
थोडक्यात हकिकत -प्रस्तुत प्रकरणी आरोपी लोकसेवक कैलास भिकाजी शेळके, वरिष्ठ लिपिक, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ कार्यालय यांनी तक्रारदार श्री. अशोक बकोरे याचे कडे तक्रारदार यांचे वडिलांच्या नावे निवासी गाळा 220 गाळे अल्प उत्पन्न गट सिविल हुडको गाळा क्रमांक 684 अ.नगर हा तक्रारदार याचे नावावर ट्रान्सफर (अभिहस्तांतरण) करण्यासाठी दिनांक 22 /3 /2016 रोजी तीन हजार रुपये लाचेची मागणी करून 16.45 वाजता लाचेची रक्कम 3000 रुपये नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ कार्यालय येथे पंचांचे उपस्थितीत श्री. शेळके यांनी तक्रारदार यांचे कडून स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. सादर बाबत मुंबई नाका पोलीस ठाणे, नासिक शहर येथे
गु.र.नं. ३०६३/२०१६, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम ७ ,१३(१)( ड), सह १३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्याची सुनावणी मा. जिल्हा न्यायाधीश – ७ श्री जे. एम. दळवी साहेब, जिल्हा सत्र न्यायालय, नाशिक यांचे समोर झाली असून सदर खटल्याचे कामकाज श्री. सचिन गोरवाडकर, सरकारी अभियोक्ता यांनी पाहिले असून त्यामध्ये पोलीसांनी केलेला तपास व महत्वाच्या साक्षीच्या आधारे मा. न्यायालयाने आरोपी लोकसेवक कैलास भिकाजी शेळक, वरिष्ठ लिपिक नासिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ कार्यालय, गडकरी चौक, नाशिक जि. नाशिक यांना आज दि. १९/०६/२०२४ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे 7 अन्वये दोषी धरून ३ वर्ष सक्तमजुरी शिक्षा व ५०००/- रूपये दंडाची शिक्षा. दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा
तसेच कलम 13 अन्वये ४ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ५०००/- दंड, दंड न भरल्यास ७ महिने सश्रम कारावास शिक्षा सुनावली आहे.
तत्कालीन तपास अधिकारी – *बाळासाहेब बडे, पोलीस निरीक्षक, तत्कालीन नेमणूक ,ला.प्र.वि. नाशिक
*सदर खटल्याचे कामकाज पाहणारे अधिकारी अंमलदार – श्री. संदीप घुगे,
पोलीस निरीक्षक,
पो.हवा/५०२ प्रदीप काळोगे व म.पो.ना. /६२७ ज्योती पाटील