इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोलकात्ताः तृणमूल काँग्रेसचे नेते अभिजित मुखर्जी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी तूणमूल काँग्रेसवर अऩेक गंभीर आरोप केले आहेत.
मुखर्जी यांनी पक्षाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, की तृणमूल काँग्रेसची कार्यसंस्कृती काँग्रेसशी अजिबात जुळत नाही. मला वाटले पुरे झाले. दिल्लीत आल्यानंतर मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे वेळ मागितली आहे. मुखर्जी म्हणाले, की काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी लगेच परवानगी दिली, तर मी लगेच काँग्रेसमध्ये सामील होईल. मुखर्जी म्हणाले, की २०१९ च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काँग्रेसमधील एका विशिष्ट व्यक्ती आणि गटाने त्यांना दुर्लक्षित केले. काही लोकांमुळे मी निवडणूक हरलो. याबाबत मी उघडपणे काहीही बोलू शकणार नाही; परंतु पक्षश्रेष्ठीना याची पूर्ण कल्पना आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये आल्यानंतर मला कोणतेही काम मिळाले नाही. त्यांच्या कार्यसंस्कृतीने मला निराश केले. मुखर्जी यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.