मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वे प्रशासनाने अनेक ठिकाणी रेल्वे गेट बंद करून बायपास अंदरग्राऊंड रस्ते तयार केले मात्र या अंदरग्राऊंड भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचते, चिखल व गाळ त्यात साचतो त्यामुळे वाहनधारक असो की पायी जाणारे नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
मनमाड जवळच्या वागदरडी येथे पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वे मार्गाखालून भुयारी रस्ता तयार केला आहे. मात्र सध्या तेथे पाणी,गाळ साचलेला असल्याने या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत मनमाड शहरात शाळेत यावे लागते. रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.